Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा (पिंपरी चिंचवड) आयोजित ‘ कलाकार कट्टा ‘ पुष्प ५ , राजमाता जिजाऊ उद्यान, चिंचवडगाव येथे शनिवार, दिनांक २८ रोजी आयोजीत करण्यात आला होता.

कलाकार कट्टयात
लोककला या विभागात शाहीर वनिता मोहिते यांच्या संजीवनी महिला शाहिरी पथक यांनी पोवाडा, पारंपरिक वाद्यात ऋषिकेश गायकवाड, जय कसबे, योगेश उकिरडे आणि निखिल झोंबाडे या कलाकारांनी ढोल ताशे यांचे सादरीकरण केले. नाट्य विभागात वरि्हा काळे आणि रजत देशमुख या बालकलाकारांनी नाट्यछटेचे सादरीकरण केले. राजू जाधव आणि सविता इंगळे यांनी कविता, जगदीश खोडके, प्रदीप मांडरे यांनी कराओके, ह भ प माई गटणे आणि सहकारी यांनी एकनाथी भारूड सादर करून रसिकांची वाहवा मिळवली.
या वेळी जुबेन आलीफ शेख यांनी लिहिलेल्या “द नॉवेल्टीज” या दोन अंकी नाट्य पुस्तकाचे प्रकाशन
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष मा. भाऊसाहेब भोईर यांचे हस्ते करण्यात आले.
या वेळी भाऊ साहेब म्हणाले, शहरातील सर्व क्षेत्रातल्या कलाकारांसाठी हा कट्टा निर्माण करण्यात आला आहे. अजून कुणाला कलाक्षेत्रा बाबत काही सुचवायचे असल्यास संपर्क साधावा. कलाकारांच्या सर्व सूचनांवर विचार करू.
या प्रसंगी शोभा जोशी, माधुरी ओक, उज्जवला केळकर, तुकाराम पाटील, प्रदीप गांधलीकर, राजेश हजारे, रेणुका हजारे, इत्यादी मान्यवर हजर होते.

सुहास जोशी, राजू बंग, सीमा गांधी, प्रकाश ढवळे, गौरी लोंढे , पंकज चव्हाण यांनी या कट्याचे नियोजन केले. आसाराम कसबे यांनी प्रस्तावना केली, किरण येवलेकर यांनी आभार मानले, तसेच राज आहेरराव यांनी सूत्रसंचालन केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version