पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड जैन महासंघाच्या वतीने भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत चिंचवड येथील केशवनगर परिसरातील कल्याण प्रतिष्ठान येथे रक्तदान व नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले.
हे शिबिर उद्या रविवारी २९ मार्चला सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत पार पडत असून नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. श्री वर्धमान स्थानक जैन श्रावक संघ व विशाल संघ यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
शिबिरात रक्तदानासोबतच नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होत आहेत. समाजसेवेच्या माध्यमातून भगवान महावीर यांच्या अहिंसा व सेवाभावाच्या विचारांचा प्रसार करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात असल्याचे आयोजकांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी संपर्क : रुपेश बागमार – 9923437311.
