पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एसबीपीआयएम) मध्ये “झिंग २०२६” महाविद्यालय अंतर्गत स्पर्धाचे शुक्रवारी आणि शनिवारी (२७ मार्च ते २८ मार्च) आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी पीसीइटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, एसबीपीआयएम संचालक डॉ. कीर्ती धारवाडकर आदी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात आयपीएल ऑक्शन, द स्टार्टअप रेस (बिझनेस प्लॅन), सुपर शॉट्स, द सीएक्सओ चॅलेंज (जनरल मॅनेजमेंट / स्ट्रॅटेजी), बॅटल ऑफ ब्रँड, लीडर लिजेंड्स, माय बिजनेस आयकॉन, मॅड ॲड तसेच शायरना अंदाज (शायरी / कविता स्पर्धा) या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तसेच सांस्कृतिक स्पर्धांमध्ये एसबीपीआयएम गॉट टॅलेंट, झलक दिखलाजा (सोलो डान्स), डान्स दिवाने (ग्रुप डान्स स्पर्धा), रॅम्प -ऑन -फायर (फॅशन शो) यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या व्यवस्थापन कौशल्यांना, सर्जनशीलता, नेतृत्वगुणांना संधी देणाऱ्या विविध उपक्रमांचा यात समावेश आहे.
एसबीपीआयएमच्या संचालिका प्राचार्या डॉ. कीर्ती धारवाडकर, शैक्षणिक विभाग प्रमुख डॉ. रूपाली कुदरे, प्रा. डॉ. प्रणिता बुरबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली झिंग चे आयोजन करण्यात आले आहे.
