Spread the love

 

थेरगाव (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजातर्फे आयोजित उपवर परिचय संमेलन २०२६ शनिवार, दिनांक २१ मार्च रोजी थेरगाव येथील स्व. शंकर आण्णा गावडे स्मृती कामगार भवन येथे उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. संमेलनाचे प्रमुख मार्गदर्शक मनोज ब्राम्हणकार व राजेंद्र महालपुरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

या संमेलनात वधू-वर तसेच त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला असून, सुमारे २७०० समाजबांधव त्यामध्ये ९८० उपवर व उपवधू उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंगआप्पा बारणे व भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न बापू काटे , नगरसेविका कुंदा भिसे, अनिता काटे, नगरसेवक माऊली जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.

यानंतर मान्यवरांनी मार्गदर्शन करताना पारंपरिक विवाह जुळवणी पद्धतींसोबत आधुनिक विचारांची सांगड घालण्याचे महत्त्व अधोरेखित केले. वाढते घटस्फोट व समाजाबाह्य विवाह या विषयांवरही त्यांनी भाष्य केले. यावेळी सुमारे ९५० परिचय पत्रकांचा समावेश असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

संमेलनात प्रत्येक वधू-वराला स्वतःची ओळख करून देण्याची संधी देण्यात आली. यामुळे पालकांना व उपस्थितांना योग्य जोडीदार निवडण्यास मदत झाली. गुणोमिलनासाठी गुरुजींची व्यवस्था तसेच परस्पर संवादासाठी स्वतंत्र वेळ देण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे समाजातील विवाह जुळवणीची प्रक्रिया अधिक सुलभ होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

सदर संमेलनाच्या यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष नितीन देव, उपाध्यक्ष योगेश मोराणकर, नितीन वाणी व सोपान पितृभक्त , सनी शिरोडे, तैलेश बामणकर, किशोर ब्राह्मणकर व पूर्ण टीमने विशेष परिश्रम घेतले. संमेलनाचे सूत्रसंचालन  रत्ना दहिवेलकर यांनी केले, तर कार्यक्रमाच्या शेवटी भामरे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version