Spread the love

 

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जगभरात अल्लाच्या आज्ञेप्रमाणे मुस्लिम बांधव रमजान ईद निमित्त महिनाभर उपवास करतात. भल्या पहाटेपासून दिवसभर पाणी, अन्न न पिता , खाता पकडलेला उपवास सायंकाळी नियोजित वेळेला सोडण्यात येतो . दिवसभरातील पाच वेळेची नमाज रात्रीची तराबी सामुदायिक नमाज होते. कुराणपठण केले जाते . गोरगरीबांना मदत केली जाते. महिन्यानंतर चंद्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी रमजान ईद साजरी केली जाते . रमजान ईद आज पिंपरी चिंचवड शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. पिंपरी चिंचवड शहरातील मुस्लिम बांधव आज सकाळी नवीन कपडे परिधान करून सुवासिक तेल , अत्तर कपड्याना परीसरातील मसी दीत एकत्र जमले . मौलानांनी प्रवचन देवून सामुदायिक नमाज पढविला . नमाज पठनानंतर एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. लहान मुले महिलांनी घरोघरी नमाज पठण केले . मोबाईल वरती आपल्या नातेवाईकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या . घरोघरी शीरखुर्माचा आनंद व आस्वाद नातेवाईक , मित्र मंडळीनी लुटला.

चिंचवडगाव येथील ईदगाह मैदानावर आलमगीर शाही मशिदीच्या वतीने अध्यक्ष इमरान पानसरे, अख्तर पिंजारी , मौलाना मिनहाज शेख ,मौलाना इमानुल हक आदींनी पिंपरी चिंचवड शहरातील अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड , सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चासकर , रणजीत जाधव, संदीप आटोळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.बी. दुबे, माजी नगरसेवक राजू गोलांडे, चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष व छायाचित्रकार गुलामअली भालदार, छायाचित्रकार संतोष हांडे, यशवंत नामदे, राजेश स्टीफन, सचिन फुलसुंदर यांच्या शाल देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड समवेत आदी पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीने समुदायीक नमाज पठनानंतर , मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. मुस्लीम बाधवानी त्याचे आभार मानले .
पिंपरी चिंचवड शहरात विविध ठिकाणी समुदायीक नमाज पठण झाले .खराळवाडी येथे जमाते-मुस्लिम मसीद ,नेहरूनगर येथे नूरानी मसीद ,संत तुकाराम नगर महंमदिया मसीद ,वल्लभनगर – मजीद ए इमरान, नेहरूनगर – हजरत बिलाल,रूपी नगर – मदीना मसीद , गांधीनगर , पिपरी – जी .एन. कॉलनी , कासारवाडी – जामा मसीद , पिंपळे गुरव – मदीना मसीद , चिंचवड स्टेशन दवा बझार – मसीद ए अम्मार , निगडी – नुरानी मजीद , आकुर्डी – मदीना मसीद व अन्यत्र ठिकाणी मौलानानी नमाज पढविला .

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version