पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री, सामाजिक न्याय, लोकशाही मूल्ये आणि सर्वसमावेशक विकासाचा मार्ग दाखवणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे चिंचवड येथे असंघटित कामगारांनी एकत्र येत जयंती साजरी केली.
यशवंतरावांच्या ध्येयवादी कार्याची आठवण यावेळी काढण्यात आली. कामगार, शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहणाऱ्या यशवंतरावांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून यशवंतरावजी चव्हाण यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. प्रगतिशील महाराष्ट्राच्या उभारणीत त्यांनी दिलेले योगदान आजही प्रेरणादायी आहे, अशी भावना उपस्थित कामगार बांधवांनी व्यक्त केली.
यावेळी नंदा जाधव, रुक्मिणी जाधव,आयशा चौधरी,
रेखा गायकवाड़,रेशमा गायकवाड,निशा अलंकार
प्रियंका चौहान,सचिन देडे,
गजानन चौहान,विद्याधर वाघमारे,संतोष भट्ट,राजेंद्र साबले आदी उपस्थित होते
