पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फॉउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले पुण्यदिन आणि आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
कार्यक्रमाचे सुंदर व प्रभावी सूत्रसंचालन स्वाती मॅडम यांनी केले. कार्यक्रमामध्ये उर्मिला मॅडम यांनी मराठी भाषण करून सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण क्षेत्रातील महान कार्याची माहिती दिली. समृद्धी मॅडम यांनी इंग्रजी भाषणातून महिला सशक्तीकरणाचे महत्त्व सांगितले, तर मनोरमा मॅडम यांनी हिंदी भाषणातून महिलांच्या समाजातील योगदानावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमासाठी फळ्यावर सुंदर लेखन चेतना मॅडम यांनी केले. तसेच राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित केलेल्या उपक्रमातील विद्यार्थ्यांना पूजा मॅडम यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी वैभवी मॅडम यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची प्रेरणा मिळाली तसेच महिला सन्मान आणि सशक्तीकरणाचा संदेश देण्यात आला.
