चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवजयंती व जागतिक महिला दिना निमित्त ‘चिंचवडचा राजा’ श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ, गांधीपेठ च्या वतीने वयवर्षे १६ ते २६ वयोगटातील मुलींसाठी चिंचवडगावातील एल्फ्रो मॉल मधील आयनॉक्स मल्टिप्लेक्स येथे ‘केरला स्टोरी २’ या चित्रपटाच्या मोफत शो चे आयोजन केले होते.
यावेळी उपस्थित तरुणींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी चिंचवड महानगर कार्यवाह श्री नरेंद्रजी पेंडसे, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी चिंचवडचा राजा श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे, नगरसेवक राहुल कलाटे, नगरसेवक मंदार देशपांडे, मंडळाचे कार्याध्यक्ष महेश मिरजकर, मंडळाचे मार्गदर्शक व जेष्ठ विधिज्ञ ॲड. बापू होनराव, जेष्ठ पत्रकार बापूसाहेब गोरे, पत्रकार मच्छिंद्र कदम, ॲड.विपुल नेवाळे, युवा नेते हेमंत डांगे, महेश कंद, राजेश शिरोळे, योगेश मिरजकर, अविनाश तिकोने, दुर्गेश मिरजकर, अमित मुथा, आदित्य मिरजकर, दत्तात्रय ढगे, धनंजय शाळीग्राम, सार्थक मिरजकर यांसह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
केरला स्टोरी २ चित्रपट पाहण्यासाठी चिंचवडगावातील युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या व यावेळी त्यांनी चित्रपटाच्या शो चे आयोजन केल्याबद्दल चिंचवडचा राजा श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळाचे आभार व्यक्त केले.
