Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, महिलांमध्ये विपणन व विक्री कौशल्ये विकसित करणे तसेच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरा आणि शहरी संस्कृतीचे जतन करणे या उद्देशाने दरवर्षी पवनाथडी जत्रा आयोजित करण्यात येते .यावर्षी पवनाथडी जत्रा दिनांक २५ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत सांगवी पी.डब्ल्यू.डी. मैदान येथे आयोजित करण्यात आली आहे.पवनाथडी जत्रा ही महिला बचत गटांसाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरली आहे.

पवनाथडी जत्रेत सहभागासाठी अर्ज वाटप व स्वीकृती दिनांक १० फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत करण्यात आली. महिला बचत गटांकडून खालीलप्रमाणे अर्ज प्राप्त झाले आहेत. जनरल प्रवर्ग – ५११, व्हेज प्रवर्ग – ३७३, नॉनव्हेज प्रवर्ग – २१०. तसेच दिव्यांग राखीव प्रवर्ग यामध्ये ५ , तृतीयपंथी प्रवर्ग – ३ असे अर्ज प्राप्त झाले आहेत. लकी ड्रॉ पद्धतीने गाळे वाटप २२ फेब्रुवारी रोजी मा. मधुकरराव पवळे सभागृह, तिसरा मजला, मुख्य कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे करण्यात आले असून सोडती नुसार जनरल प्रवर्गासाठी ४०५, व्हेज प्रवर्गासाठी १७२, नॉन व्हेज प्रवर्गातील १३५ बचत गटांना गाळे देण्यात येणार आहेत.

ज्या बचत गटांना सोडतीमध्ये स्टॉल मिळालेले आहेत, त्या स्टॉलसाठीचे अलोटमेंट लेटर वाटप आज मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी पी.डब्लु. डी.ग्राउंड, जुनी सांगवी येथे सकाळी ११.३० पासून करण्यात येणार आहे. सोडतीमध्ये स्टॉल मिळालेल्या बचत गटांची यादी समाज विकास विभाग माहिती केंद्र येथे लावण्यात आली असून ज्या बचत गटांना स्टॉल मिळालेले आहेत, त्या सर्वांना त्याबाबतचे एसएमएस देखील मोबाईलवर पाठवण्यात आलेले आहेत. ज्या बचत गटातील महिला गाळा वाटप पत्र घेण्यासाठी येणार आहे, त्यांनी सोबत येताना आधार कार्डची झेरॉक्स, एक पासपोर्ट साईज फोटो आणि बँक पासबुक घेऊन यावे असे आवाहन करण्यात येत आहे.

तरी ज्या महिलांना सोडतीमध्ये गाळा मिळालेला आहे त्या महिला बचत गटांनी उद्या साडेअकरा वाजता आवश्यक कागदपत्रासह उपस्थित रहावे असे आवाहन समाज विकास विभागाच्या उप आयुक्त ममता शिंदे यांनी केले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version