Spread the love
शाहूनगर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शिवजयंती निमित्त श्री शाहू सार्वजनिक वाचनालय, शाहूनगर यांच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.आर्ट ऑफ लिविंग परिवाराचे प्रशिक्षक विलास जेऊरकर यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. वाचनालयाचे अध्यक्ष बालकिशन मुत्याल यांनी प्रास्ताविक केले.  मनिषा पाटील यांनी शिवरायांचा पाळणा सादर करून उपस्थितांच्या मनात शिवभक्तीची भावना जागृत केली. 
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते कैलास दुर्गे ,  वाचनालयाचे अध्यक्ष बालकिशन मुत्याल,  उपाध्यक्ष राजेंद्र घावटे, सचिव राजाराम वंजारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
गणेश सहाणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय कार्याचा आढावा घेत  उपस्थितांना शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंग ओघवत्या शैलीत सांगितले.
रवींद्र अडसूळ आणि तेजश्री घेवारी यांनी संयोजनात पुढाकार घेतला.सूत्रसंचालन  राजेंद्र घावटे यांनी केले. आभार प्रदर्शन राजाराम वंजारी यांनी केले.वाचनालयाचे संचालक, सल्लागार , कर्मचारी व वाचकांनी आवर्जून उपस्थित राहून छ. शिवाजी महाराजांना अभिवादन केले.
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version