Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल, रहाटणी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती  उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात शाळेपासून रहाटणी गावातील अश्वरूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत भव्य रॅलीने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी हातात भगवे झेंडे घेऊन “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला.

पुतळ्याजवळ छत्रपती शिवाजी महाराजांना संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार ह्यांचा हस्ते  पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन करण्यात आले. कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका सविता खुले यांचीही उपस्थिती लाभली. अखिल रहाटणी गाव चे कमिटीचे अनेक मेंबर्स उपस्थित होते. यावेळी इयत्ता सहावीचा विद्यार्थी सार्थक ननावरे याने सादर केलेल्या शिवगर्जनेमुळे उपस्थित सर्वांमध्ये नवचैतन्य संचारले व परिसर ऊर्जेने भारावून गेला.

यानंतर सर्व विद्यार्थी व शिक्षक शाळेत परतले. शाळेत शिवजयंतीनिमित्त छोटेखानी पण अर्थपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, उपमुख्याध्यापक सचिन कलसईत तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजश्री तायडे यांनी केले. इंग्रजी भाषण सारिका देशमुख, कार्यक्रमात इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी ‘युगत मांडली’ या संकल्पनेवर आधारित नृत्य सादर केले,  मराठी भाषण समृद्धी वाघमारे, तसेच इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी ‘हिरकणी’ या ऐतिहासिक प्रसंगावर आधारित नाट्यरूप सादरीकरण करून सर्वांची मने जिंकली तर हिंदी भाषण अनिता पाटील यांनी प्रभावीपणे सादर केले.याचबरोबर इयत्ता सातवीचा विद्यार्थी विश्वजीत काटे याने सादर केलेल्या पोवाड्याने कार्यक्रमाला विशेष रंगत आणली. कार्यक्रमाचा समारोप कल्पना चौधरी यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.

हा संपूर्ण कार्यक्रमविद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शौर्य, त्याग, नेतृत्वगुण व संस्कार रुजविणारा ठरला.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version