Spread the love

*सुधारित*

*प

– ४ हजार चौरस फूट बांधकाम जमीनदोस्त; अडीच एकर वाहनतळाची जागा मोकळी!

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) मंगळवारी (दि. १०) अनधिकृत बांधकामांविरुद्ध धडक मोहीम राबवत, कारवाईचा बडगा उगारला. प्राधिकरणाच्या सेक्टर ९ आणि ११ मधील पत्राशेड्स, गॅरेजेस तसेच भोर तालुक्यातील अनधिकृत होर्डिंग्जवर ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत सुमारे ४ हजार चौरस फूट बांधकाम पाडण्यात आले असून, अडीच एकर शासकीय जागा मोकळी करण्यात आली आहे.

दि. १० फेब्रुवारी रोजी सेक्टर ९ मधील पत्राशेड, तसेच सेक्टर ११ मधील ४५ मीटर रस्त्यालगत असलेल्या गॅरेज आणि लेबर कॅम्पवर (कोठी) कारवाई करण्यात आली. वाहनतळासाठी आरक्षित जागेवर उभारलेली बेकायदेशीर पत्राशेड हटवून २.५ एकर क्षेत्र मोकळे करण्यात आले. या परिसरातील इतर टपरीचालक व वाहनतळधारकांना जागा तातडीने खाली करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
तसेच, भोर तालुक्यातील शिंदेवाडी येथेही ‘पीएमआरडीए’च्या पथकाने कारवाई केली. येथील श्री. पानसरे (गट क्र. ६०) यांची दोन होर्डिंग्ज, तसेच श्री. शिंदे (गट क्र. ६२, संस्कृती ॲडव्हर्टायझिंग) यांच्या अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्यात आली. इतर बेकायदेशीर होर्डिंग्ज हटवण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.

सदर कारवाई महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आय़ुक्त दीपक सिंगला, आणि दक्षता विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाच्या सहआयुक्त डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील, उपायुक्त आशा होळकर, तहसीलदार रवींद्र रांजणे यांच्यासह नियोजन सहाय्यक व अभियंत्यांच्या पथकाचा सहभाग होता.

परवानगी घेऊनच बांधकामे करा!
“परिसरातील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली आहे. नागरिकांनी आणि बांधकामधारकांनी पीएमआरडीएची रीतसर परवानगी घेऊनच बांधकामे करावीत, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल.” —
– डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील, सहआयुक्त, पीएमआरडीए

Share.

Comments are closed.

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version