Spread the love
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे पिं. चिं. शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांना “डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण जिवनगौरव” पुरस्कार मेजर महेंद्र गवई यांच्या हस्ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात देण्यात आला.गवई म्हणाले की पुरस्कार प्रेरणा देतात ,सामाजिक कार्य देशसेवा समजून देशहितासाठी  करण्याचा मोलाचा संदेश त्यांनी दिला. तुम्ही सेवेसाठी कुटुंबातील एक तरी व्यक्ती द्या असे भावनिक आवाहन उपस्थितांना केले.
 पुरस्काराला उत्तर देताना अण्णा जोगदंड म्हणाले की, आपल्याला समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि ते दिले पाहिजे या उदात्त भावनेतून आम्ही दोघेही पती-पत्नी  काम करत आसतो, आम्ही दोघेही महाराष्ट्र शासनाचे पहिले पती-पत्नी गुणवंत कामगार असून ,यापुढे ही आम्ही सामाजिक काम करत राहू आणि संस्थेच्या निवड समितीने माझ्या कार्यावर विश्वास दाखवला त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी त्यांनी यावेळी ग्वाही दिली .
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ.शंकर आदानी, साई इंडियन ट्रस्टचे, नवी दिल्ली ते म्हणाले की, श्लोक फाउंडेशन,साऊ ज्योती संस्था, माता रमाई आंबेडकर संस्था या संस्थेचे कार्य महाराष्ट्रात सर्व दूर काम पोहोचलेले आहेत. महाराष्ट्रातील समाज हितासाठी काम करणाऱ्या हिऱ्यांना पारखून त्यांनी पुरस्कार दिला आहे असे गौरव त्यांनी यावेळी काढले .
संस्थेचे अध्यक्ष सचिन हळदे  म्हणाले की पुरस्कारार्थिने निस्वार्थपणे सामाजिक कार्य केलेली आहे तुमच्या माध्यमातून अंधाराला वाट दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला आहे म्हणूनच तुमचा सन्मान केलेला आहे आणि संस्थेच्या वतीने *वृद्धघर* हे चालू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
यावेळी अण्णा जोगदंड, संस्थेचे अध्यक्ष सचिन हळदे, सुभेदार महेंद्र गवई, डाँ शंकर आदानी सिने अभिनेते बाळराजे वाळुंजकर, अभिनेत्री चित्रा दीक्षित ,मुख्य आयोजक विकास उबाळे,अभिनेत्री प्रिया दामले, सुनील म्हात्रे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या वेळी ” मी महात्मा ज्योतिराव फुले बोलतोय” हे एकपात्री नाटक सादर करण्यात आले डॉ.रोहिणी काळे यांनी देशभक्तीपर गीतांचाही कार्यक्रम  सादर करण्यात आला .
प्रास्ताविक विकास उबाळे यांनी केले तर सूत्रसंचालन अँड उमाकांत आदमाने,पुजा पाटील केले.
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version