Spread the love
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  इंटर इंजीनियरिंग डिप्लोमा स्टुडन्ट स्पोर्ट्स असोसिएशन इंटर झोनलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निकच्या मुलांच्या संघावर नारायणगाव, कुरण येथील जयहिंद पॉलीटेक्निक संघाने १४ धावांनी विजय मिळवला. संघ प्रमुख वरद सराफ, जय तारक, जय शर्मा यांच्या अष्टपैलू खेळामुळे हे यश मिळाले. अंतिम सामन्यात गोलंदाज मयूर धांडे, वरद सराफ यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून उत्कृष्ट गोलंदाजी केली.
    वाघोली येथील भिवराबाई सावंत पॉलिटेक्निक येथे आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेत डी १ झोन मधील पॉलिटेक्निकच्या १४ संघांनी सहभाग घेतला होता.
   पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक (पीसीपी) संघाला संघ व्यवस्थापक एस. एस. धानूरे, सोमनाथ खेडेकर, रुपेश पवार, प्रविण नाईक क्रीडा समन्वयक, सुनील जगताप, किशोर गव्हाणे, लक्ष्मी थरकुडे प्राचार्य डॉ. विद्या बॅकॉड यांनी मार्गदर्शन केले.
    पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version