Spread the love

 

पुणे,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये १९२४ मध्ये मिलिटरी इंजीनियरिंग सर्व्हिस (एमईएस) या केंद्र सरकारच्या संस्थेची स्थापना झाली. या नंतर दोन वर्षांनी १९२६ मध्ये एमईएस एम्प्लॉईज को – ऑप. क्रेडिट सोसायटी लि. या संस्थेची स्थापना झाली. एमईएसच्या निवडक कामगारांनी एकत्र येऊन सुरू केलेली ही संस्था सुमारे १० हजार पेक्षा जास्त सभासदांना एकत्र करून सलग १०० वर्षे सुलभ पद्धतीने कर्ज वितरण देऊन सेवा देत आहे हे एमईएस साठी खूप गौरवशाली आहे. या सोसायटीने सीबीएस ही अत्याधुनिक संगणक प्रणाली सुरू केली आहे. यामुळे आणखी कार्यक्षमता वाढून उत्तम सेवा सभासदांना मिळेल असा विश्वास मेजर जनरल, मुख्य अभियंता दक्षिण कमांड सुधीर ठाकूर यांनी व्यक्त केला.

पुणे येथील एमईएस एम्प्लॉईज को – ऑप. क्रेडिट सोसायटी लि. या संस्थेच्या शतक महोत्सव वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सुधीर ठाकूर बोलत होते. यावेळी सीआरसीएस, केंद्र सरकार, नवी दिल्ली सहसचिव मोनिका खन्ना, आयडीएसई, सीई पुणे झोन व्ही. पी. श्रीवास्तव, एमईएस सोसायटीचे अध्यक्ष विलास भोंडवे, सचिव राजेश टिळेकर, उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे, सहसचिव दीपेश नाटक, मुंबई शाखा सचिव शेखर व्यवहारे, संचालक संतोष आराख, निलेश रोकडे, ललित पुंडकर, सीईओ सी. एन. तोंडे तसेच कर्नल सुमित वशिष्ठ, कर्नल विकास सिंग सेनगर, कर्नल सत्य नारायण, पीसीडीए स्वाती सुर्वे, उमेश कुमार, अभिजित पॉल, के. प्रसाद, विनय प्रताप, देवेंद्र कुमार, अंगद तिवारी, कामेश्वर प्रसाद, सुनील कागे, धीरेंद्र सिंग, दिलीप कुमार, पी. एस. राव आदी उपस्थित होते.
यावेळी लकी ड्रॉ मध्ये विजेत्या झालेल्या शुभांगी टिळेकर, आरती वायकर, अनुजा मेढेकर, मंगल टिळेकर आणि रिजवाना शेख या भगिनींना पैठणी देऊन गौरविण्यात आले.
तत्पूर्वी रास्ता पेठ, पुणे येथील एमईएस एम्प्लॉईज को – ऑप क्रेडिट सोसायटीच्या कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले आणि केक कापून शतक महोत्सव साजरा करण्यात आला.

सोसायटीचे अध्यक्ष विलास भोंडवे यांनी स्वागत करताना सांगितले की, केंद्र सरकारच्या संरक्षण विभागातील मिलिटरी इंजीनियरिंग सर्व्हिस मधील देशातील १३ राज्यातील अधिकारी व कर्मचारी या क्रेडिट सोसायटीचे सभासद आहेत. अवघ्या एक रुपये सभासद फी पासून सुरू झालेली ही संस्था सलग १०० वर्षे सेवा देऊन १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल दरवर्षी करत आहे. हे सभासदांनी संचालक मंडळावर दाखविलेल्या विश्वासामुळे शक्य झाले आहे. पुढील काळात देखील सभासदांना आणखी उत्कृष्ट सेवा देण्याची हमी देखील देत आहे.
प्रास्ताविक करताना सचिव राजेश टिळेकर यांनी सांगितले की, आमच्या सोसायटीला लेखापरीक्षण अहवालात सतत “अ” वर्ग दर्जा मिळत आहे. सात लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण आणि मृत्यू फंड या अतिरिक्त सेवा देण्यात येतात. मागील वर्षी संस्थेने ७ टक्के डिव्हिडंड दिला असून मुदत ठेवींवर ८ टक्के वार्षिक व्याज देण्यात येते. कर्मचारी सेवेतून निवृत्त झाले तरी त्यांच्याशी सोसायटीचे कौटुंबिक संबंध टिकून राहतात त्यामुळेच आज हजारो सभासद आपल्या कुटुंबांसह या कार्यक्रमास उपस्थित आहेत.
सूत्र संचालन उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे आणि आभार संचालक संतोष आराख यांनी मानले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version