Spread the love

 

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – बालगंधर्व रंगमंदिर कलादालन पुणे येथे नुकतेच कॅनव्हास ग्रुप तर्फे भव्य चित्रकला प्रदर्शन भरविले होते दिनांक 15 जानेवारी 2026 ते 17 जानेवारी 2026 या कालावधीत हे प्रदर्शन झाले .

सदरील चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार श्री अनिल सोनवणे यांच्या हस्ते झाले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध सिने अभिनेते श्री अमोल भोसले उपस्थित होते तसेच अ‍ॅड.प्रकाश सोळंकी ,चित्रकार व कलाशिक्षक आनंद गजरमल हे मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या वेळी श्री अनिल सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की, आताच्या धावत्या युगातही चित्रकारांनी आपली चित्रकला जपावी हेच कौतुकाचे आणि कलाकाराला अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे एकत्र येऊन अनेक विविध अविष्कार मांडावा म्हणजे चित्रकलेची ती जोपासना होईल.
तसेच प्रमुख पाहुणे सिने अभिनेता श्री अमोल भोसले म्हणाले की, आजच्या डिजिटल युगात चित्रकारांनी आपली कला जोपासली ही खरी फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे तसेच या डिजिटल युगातही चित्रकलेचाच प्रभाव दिसत आहे तसेच फार मोठ्या कष्टाने हे चित्रकला प्रदर्शन भरवण्यात आलेले आहे हे दिसून येत आहे कलाकार आपली कला भावनेतून उतरवतो मग ती चित्रकला असो किंवा अभिनय त्यामुळे वेळोवेळी कलाकाराने आपली कला जोपासावी.

कार्यक्रमाच्या वेळी चित्रकार अरुण काळे शशिकांत डोळस यांनी आपली मनोगते व्यक्त केली चित्रकार गणेश कदम (ढोले ),प्रदीप डोळस यांनी स्वागत केले आभार गणेश कदम (ढोले) यांनी केले पाहुण्यांनी चित्रकारांचे कौतुक केले आपल्या मनोगतातून श्री अमोल भोसले यांनी पुणेकरांना प्रदर्शन पाहण्याबाबत आवाहन केले यावेळी सिद्धार्थ इंगळे प्रज्ञा कांबळे व इतर चित्रकार सगळे उपस्थित होते

Share.
Leave A Reply

Exit mobile version