Spread the love

पिंपरी चिंचवड ॲड असोसिएशनच्या  अध्यक्षपदी ॲड. बी. के. कांबळे

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड ॲड असोसिएशन यांचा पदग्रहण व सत्कार समारंभाचा कार्यक्रम पिंपरी न्यायालय येथील पुरुष वकिल बार रूम मध्ये संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी महिला अध्यक्षा ॲड.प्रमिला गाडे व प्रमुख उपस्थिती माजी अध्यक्ष ॲड नारायण रसाळ उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड ॲड असोसिएशनचे मा. अध्यक्ष ॲड पांडुरंग शिनगारे, वकील विकास संघाचे अध्यक्ष ॲड अरुण (मामा) खरात उपस्थित होते. माजी अध्यक्ष ॲड पांडुरंग शिनगारे व माजी अध्यक्ष नारायण रसाळ यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून पदभारतीला पुढील वाटचालीसाठी नवनिर्वाचित कमिटीला शुभेच्छा दिल्या. त्यावेळी पिंपरी चिंचवड  ॲडव्होकेट असोसिएशन चे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिलेले ॲड श्रीराम गालफाडे यांनी सर्व निवडून आलेल्या पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मान केला व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड बी के.  कांबळे यांनी असे आश्वासन दिले की वकिलांच्या हिताचे कामकाज केले जाईल व वकील हिताचे निर्णय घेतले जातील. बार बेंच यांचे हितसंबंध सन्मानपूर्वक जपले जातील. मोरवाडी येथे नवीन सेशन कोर्ट उद्घाटन सोहळा लवकरच पार पडणार असून त्या ठिकाणी सुद्धा वकील हिताचे निर्णय घेतले जातील असे आश्वासन नवनिर्वाचित अध्यक्ष यांनी दिले.

पिंपरी चिंचवड    ॲडव्होकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष  ॲडव्होकेट बी के कांबळे, उपाध्यक्ष ॲड वर्षा मधुकर कांबळे/तिडके, सचिव ॲड नारायण रामभाऊ थोरात,महिला सचिव एडवोकेट प्रिया नंदकुमार धावडे,  हिशोब तपासणीस  ॲडव्होकेट  खजिनदार दत्ता सुदाम शेंडगे,  सदस्य  ॲडव्होकेट  स्वाती श्रीकांत पितळे,    ॲडव्होकेट  शारदा सखाराम गालफाडे,  ॲडव्होकेट   हर्षदा उत्कर्ष दोडके,  ॲडव्होकेट  नेहा बळीराम सोनवणे  यांचा समावेश आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version