पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी येथील
नवमहाराष्ट्र विद्यालयाचे माजी प्राचार्य एस.एन. पाटील (वय ९४, रा. पिंपरीगाव) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
रयत शिक्षण संस्थेच्या वाडा, पिंपरी, वडगावमावळ,
शाहूवाडी या ठिकाणी यशस्वी मुख्याध्यापक म्हणून काम केले होते. या सर्व ठिकाणी सार्वजनिक लोक वर्गणीतून शाळेच्या इमारती बांधण्यात त्यांचा
मोलाचा वाटा होता. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
