Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वाकड परिसरात प्रभाग २६ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) यांच्या उमेदवार सौ. सारिका गणेश कस्पटे यांची जनसामान्यांमध्ये झपाट्याने वाढणारी लोकप्रियता सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. विश्वास, सेवा आणि विकास या तीन भक्कम आधारांवर उभी असलेली त्यांची राजकीय भूमिका हीच त्यांच्या वाढत्या जनसमर्थनाची प्रमुख ताकद असल्याचे दिसून येत आहे.

स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन अडचणी, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, वाहतूक, स्वच्छता, महिलांसाठी सुरक्षितता तसेच युवकांच्या रोजगार व कौशल्यविकासाच्या प्रश्नांवर सारिका कस्पटे यांनी सातत्याने प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. केवळ निवडणुकीपुरते नव्हे, तर मागील काळात समाजसेवेतून निर्माण केलेला विश्वास आज प्रचारात स्पष्टपणे प्रतिबिंबित होत असल्याचे चित्र आहे.
वाकडमधील विविध सोसायट्या, वस्तीभाग, व्यापारी वर्ग, महिला बचत गट आणि युवक संघटनांमध्ये त्यांना मिळणारा सकारात्मक प्रतिसाद हे त्यांच्या कामाची पोचपावती मानली जात आहे. “जनतेशी थेट संवाद, खोटी आश्वासने नव्हे तर वास्तववादी विकासाचा आराखडा” हे त्यांचे प्रचारातील मुख्य सूत्र ठरत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) यांच्या विचारधारेशी प्रामाणिक राहून, स्थानिक प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवणारी नेतृत्व म्हणून सारिका कस्पटे यांची ओळख वाकडमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळेच ‘उमेदवार नव्हे, तर विश्वासाचं नेतृत्व’ अशी भावना नागरिकांमध्ये दृढ होत असल्याचे दिसते.

निवडणुकीची रणधुमाळी वाढत असताना, जनतेच्या ताकदीवर उभी असलेली ही उमेदवारी वाकडच्या राजकारणात नवा बदल घडवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, सारिका कस्पटे यांची लोकप्रियतेची लाट निर्णायक ठरेल, अशी चर्चा राजकीय जाणकारांमध्ये रंगू लागली आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version