Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ११ मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार   नारायण बहिरवाडे यांनी थेट नागरिकांशी संवाद साधत प्रचाराला वेग दिला आहे. प्रभागातील पूर्णानगर येथील विविध सोसायट्यांमध्ये त्यांनी भेटीगाठी घेत नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या.

या भेटीदरम्यान नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, स्ट्रीट लाईट, सुरक्षितता आदी प्रश्न मांडले. बहिरवाडे यांनी प्रत्येक मुद्दा गांभीर्याने ऐकून घेत विकासाबाबत सविस्तर चर्चा करत ठोस उपाययोजनांची ग्वाही दिली. सारिका पवार यांच्या सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग ११  नारायण बहिरवाडे यांच्या पॅनलच्या  प्रचारार्थ सभेची रणधुमाळी घरा घरात पोहोचत आहे. “प्रभागाचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे” अशी भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली.

नागरिकांनीही सहकार्याची सकारात्मक भूमिका घेत विश्वास आणि पाठिंब्याचा प्रतिसाद दिला. थेट संवाद, साधी मांडणी आणि स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे बहिरवाडे यांच्या प्रचाराला चांगलीच धार मिळताना दिसत आहे.  प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून ‘घड्याळा’च्या चिन्हाभोवती वातावरण अधिकच अनुकूल होत असल्याचे चित्र आहे.

प्रभाग ११ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार घराघरात पोहोचत असून बहिरवाडे नारायण सदाशिव यांच्या संवादात्मक प्रचारामुळे विरोधकांवर दबाव वाढत चालल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version