Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १६ मध्ये राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले असून रावेत–किवळे परिसरातील केरळी बांधवांनी दीपक भोंडवे यांच्या पॅनलला दिलेला जाहीर पाठिंबा ही निवडणुकीतील महत्त्वाची घडामोड मानली जात आहे. विविध समाजघटकांना सोबत घेऊन चालणाऱ्या भोंडवे पॅनलच्या प्रचाराला आता सामाजिक पाठबळ अधिक बळकट होत असल्याचे चित्र दिसत आहे.

रावेत व किवळे परिसरात मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेल्या केरळी बांधवांनी विकास, पारदर्शक कारभार आणि मूलभूत सुविधांसाठी सातत्याने आवाज उठवणाऱ्या दीपक भोंडवे यांच्या भूमिकेवर विश्वास व्यक्त केला आहे. “नेतृत्व असेच असावे जे समाजाच्या प्रत्येक घटकाला समान न्याय देईल,” अशी भावना व्यक्त करत केरळी बांधवांनी भोंडवे पॅनलच्या प्रचारात सक्रिय सहभाग नोंदवला.

या भेटीदरम्यान स्थानिक प्रश्न, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. दीपक भोंडवे यांनीही केरळी समाजाच्या समस्या ऐकून घेत, निवडणुकीनंतर त्या सोडवण्यासाठी ठोस पावले उचलण्याचा शब्द दिला. “प्रभागाचा विकास हा सर्वसमावेशक असला पाहिजे. कोणताही समाज दुर्लक्षित राहणार नाही,” असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.

केरळी बांधवांचा हा पाठिंबा प्रभाग क्रमांक १६ मधील राजकीय समीकरणे बदलू शकतो. आधीच वाढत असलेल्या प्रचार आघाडीला आता सामाजिक एकजुटीची धार मिळाल्याने दीपक भोंडवे यांच्या पॅनलचा आत्मविश्वास दुणावला आहे. येत्या काळात प्रभाग १६ मध्ये ही साथ किती निर्णायक ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version