पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १२ मध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार शांताराम भालेकर यांच्या प्रचाराला तळवडे परिसरात प्रचंड वेग आला असून, तळवडेकरांनी एकजुटीने रस्त्यावर उतरत जोरदार झंझावात उभा केला आहे. घरोघरी प्रचार, पदयात्रा, कॉर्नर सभा आणि थेट जनसंवादाच्या माध्यमातून भाजपचा प्रचार शिगेला पोहोचला आहे.
“काम करणारा, जनतेशी जोडलेला आणि विकासाला प्राधान्य देणारा उमेदवार” अशी स्पष्ट ओळख असलेल्या शांताराम भालेकर यांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, प्रचारादरम्यान ‘आता बदल नाही, तर मजबूत नेतृत्व हवे’ अशी मतदारांची भावना ठळकपणे व्यक्त होत आहे. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, सुरक्षा आणि नागरी सुविधा यांसारख्या प्रश्नांवर भालेकर यांनी मांडलेली ठोस भूमिका नागरिकांच्या मनाला भिडताना दिसत आहे.
तळवडेकरांचा वाढता सहभाग, कार्यकर्त्यांची आक्रमक तयारी आणि भाजपच्या संघटनशक्तीमुळे प्रभाग १२ मध्ये राजकीय वातावरण तापले असून विरोधकांवर स्पष्ट दबाव निर्माण झाला आहे. “भाजप म्हणजे विकासाची ग्वाही” हा संदेश घराघरात पोहोचत असून, शांताराम भालेकर यांच्या प्रचारातून विजयाची चाहूल स्पष्टपणे जाणवत आहे.
आगामी निवडणुकीत प्रभाग १२ मध्ये भाजपचा झेंडा फडकवण्याचा निर्धार तळवडेकरांनी केला असून, हा झंझावात थेट मतपेटीत उतरल्यास चित्र निर्णायक ठरणार, यात शंका नाही.
