Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १८ मधील काकडे पार्क परिसरात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ॲड. मोरेश्वर शेडगे यांनी घरोघरी भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला. या जनसंपर्क मोहिमेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सक्रिय सहभाग पाहायला मिळाला.

नागरिकांच्या घरात जाऊन त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि विकासासंबंधीच्या सूचनांचा थेट आढावा घेताना ॲड. शेडगे यांनी “जनतेशी थेट संवाद, लोकांचा सहभाग आणि परस्पर सहकार्य याच माध्यमातून सक्षम, सुरक्षित व विकसित प्रभाग उभारता येतो,” असा ठाम विश्वास व्यक्त केला.
या भेटीदरम्यान पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, नागरी सुविधा तसेच युवक व ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या सोयी-सुविधांबाबत नागरिकांनी मते मांडली. विकासकामांबाबत स्पष्ट भूमिका, कायदेशीर जाण आणि लोकहिताला प्राधान्य देणारा दृष्टिकोन यामुळे ॲड. मोरेश्वर शेडगे यांच्याबद्दल नागरिकांमध्ये विश्वास वाढताना दिसून आला.
भारतीय जनता पार्टीच्या विकासाभिमुख धोरणांवर आणि लोकहिताच्या विचारांवर नागरिकांचा वाढता विश्वास या जनसंवादातून प्रकर्षाने जाणवत असून, प्रभाग क्रमांक १८ मध्ये भाजपाचे स्थान अधिक भक्कम होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. आगामी निवडणुकीत हा विश्वास मतपेटीतही उमटेल, असा आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये दिसून येत आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version