Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २० मध्ये राजकीय वातावरण तापले असून शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवार राजेश वाबळे यांच्या पॅनलचा प्रचार वेगाने पुढे सरकत आहे. घराघरांत पोहोचत धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाचा जागर करण्यात येत असून मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळच्या पदयात्रा, सायंकाळच्या प्रचार फेऱ्या, कोपरा सभा आणि थेट संवादाच्या माध्यमातून वाबळे पॅनल नागरिकांपर्यंत विकासाचा संदेश पोहोचवत आहे. “काम करणारे नेतृत्व, स्थिर प्रशासन आणि स्थानिक प्रश्नांना प्राधान्य” हा प्रचाराचा केंद्रबिंदू ठरत असून पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि युवक-महिला सक्षमीकरण या मुद्द्यांवर भर दिला जात आहे.

प्रचारादरम्यान धनुष्यबाणाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला असून कार्यकर्त्यांची मोठी फळी मैदानात उतरल्याचे चित्र आहे. नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद आणि वाढता पाठिंबा पाहता प्रभाग २० मध्ये वाबळे पॅनलची घोडदौड लक्षवेधी ठरत आहे. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात हा प्रचार कितपत निर्णायक ठरणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version