Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रावेत, किवळे आणि मामुर्डी परिसरात सध्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू एकच नाव ठरत आहे प्रभाग १६ मधील भाजपचे अधिकृत उमेदवार दीपक भोंडवे. “फक्त बोलणारा नव्हे, तर प्रत्यक्ष काम करणारा जनसेवक हवा” अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत असून, या अपेक्षांचे प्रतीक म्हणून भोंडवे यांच्याकडे पाहिले जात आहे.

या तिन्ही भागांमध्ये पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, वाहतूक कोंडी, आरोग्य व स्वच्छतेचे प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत. या मुद्द्यांवर दीपक भोंडवे यांनी सातत्याने पाठपुरावा करत थेट नागरिकांशी संवाद साधला आहे. समस्या ऐकून घेण्यापलीकडे जाऊन त्या सोडवण्यासाठी प्रशासनाशी संघर्ष करण्याची तयारी दाखवणारा नेता म्हणून त्यांची ओळख तयार होत आहे.
घराघरांत प्रचार करताना, सोसायटी बैठकांमध्ये आणि स्थानिक कार्यक्रमांत भोंडवे यांना मिळणारा प्रतिसाद लक्षणीय आहे. युवकांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व स्तरांतून “आम्हाला काम करणारा जनसेवक हवाय” ही भावना ठळकपणे उमटत असून, त्याचे प्रतिबिंब दीपक भोंडवे यांच्या वाढत्या जनसमर्थनात दिसून येत आहे.

नागरिकांच्या मते, विकासाचे प्रश्न केवळ निवडणुकीपुरते न मांडता वर्षभर पाठपुरावा करणारा प्रतिनिधी हवा आहे. हीच भूमिका भोंडवे यांनी आपल्या प्रचारातून मांडली आहे. “जनतेसोबत उभे राहून, त्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरायला मी तयार आहे,” असा निर्धार ते व्यक्त करत आहेत.
रावेत–किवळे–मामुर्डी परिसरात सुरू असलेली ही चर्चा आता केवळ चर्चेपुरती न राहता राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दाखवत आहे. येत्या निवडणुकीत मतदार ‘काम करणारा जनसेवक’ कोणाला मान्यता देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version