Spread the love

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिरो मोटो कॉप कंपनीच्या सामाजिक बांधिलकीतून क्रेझ इंग्लिश मीडियम स्कूल कोल्हेवाडी खडकवासला पुणे येथे 500 शालेय विद्यार्थ्यांना मोफत हेल्मेट वाटप हिरो मोटोकॉप कंपनीच्या सामाजिक बांधिलकीतून करण्यात आले या उपक्रमात इंडियन हेड इंजुरी फाउंडेशन नवी दिल्ली व सेफ इंडिया ओरिसा या संस्थेचा आयोजनामध्ये महत्त्वाचा वाटा होता महाराष्ट्र राज्यातील 5000 हेल्मेट वाटपाची महत्त्वाची जवाबदारी मोटर ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी यशस्वीरित्या पार पडली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे संचालक सागर कोल्हे यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रूपाली चाकणकर अध्यक्ष राज्य महिला आयोग व प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांनी भूषवले, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अनिल वळीव रस्ता सुरक्षा विभाग परिवहन आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी भूषविले, सचिन सावदेकर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा चे महत्व पटवून दिले.

यावेळी  नेहा भालसिंग सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पुणे, हवेली पोलीस स्टेशन पीआय सचिन वागंडे ,निलेश पांडे,पुणेशहर कार्यअध्यक्ष तनविर शेख,पै.शैलेश मते,चैधरी मेजर, सतोष तोडकर,यांनी शालेय विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा विषयक प्रतिज्ञा दिली. सदर प्रसंगी हेल्मेट वापराचे महत्व व हेल्मेट ची वैशिष्ट्ये खास शालेय विद्यार्थ्यांसाठी डिझाईन केलेले हेल्मेट वॉटरप्रूफ असून शालेय विद्यार्थ्यांसाठी इयर सेफ्टी ही वैशिष्ट्ये या हेल्मेटमध्ये दिसून येतात .

सदर हेल्मेट हिरो मोटो कॉप कंपनी यांनी स्पेशली शालेय विद्यार्थ्यांसाठी तयार करून घेतले आहे हेल्मेट चे वैशिष्ट्य व कार्यक्रमाचे प्रयोजन व मोटार वाहन कायद्यातील अत्यावश्यक तरतुदी या विषयाची माहिती राजू घाटोळे अध्यक्ष मोटर ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य, यांनी दिली.

सदर प्रसंगी असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष महेश चव्हाण, राज्याचे सारथी 4.0 सिस्टीम हेड अनोज शिंदे, राज्य सोशल मीडिया विभागाचे व पत्रकार सुरज देवकर, गणेश बाजारे, रेवणनाथ वाळुंज, संतोष निवगुणे आदी मान्यवर व क्रेझ इंग्लिश मीडियम स्कूल कोल्हेवाडी खडकवासला पुणे प्रिन्सिपल धनश्री जाधव, शिक्षिका, शालेय विद्यार्थी व पालक सदर प्रसंगी उपस्थित होते आभार प्रदर्शन क्रेझ इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रिन्सिपल धनश्री जाधव यांनी केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version