Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागात राजकीय हालचालींना वेग आला असून, विकासाच्या मुद्द्यावरून मतदारांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत विनोद नढे यांनी प्रभागातील मूलभूत प्रश्न, पायाभूत सुविधा आणि रखडलेले विकास प्रकल्प यांचा सविस्तर आढावा घेतला.

या बैठकीत बोलताना विनोद नढे यांनी स्पष्ट केले की, प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच केंद्रबिंदू ठेवून निर्णय घ्यावा लागेल. “राजकारणापेक्षा विकास महत्त्वाचा असून, प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, आरोग्य व शिक्षणाच्या सुविधा सक्षम करण्यासाठी भाजपला साथ देणे आवश्यक आहे,” असे आवाहन यावेळी विनोद नढे मतदारांना केले.

नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना, आगामी काळात कोणते प्रकल्प राबवले जाणार आहेत, त्यासाठी निधी कसा उपलब्ध होणार आहे आणि कामांची अंमलबजावणी कोणत्या टप्प्यात होईल, याची माहिती देण्यात आली. प्रभागातील प्रलंबित प्रश्न कार्यक्षमतेने सोडवण्यासाठी समन्वयाने काम करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, आज प्रभागात प्रचाराचा आढावा घेत वाहन रॅली व प्रत्यक्ष प्रचार फेरीद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्यात आले. घरोघरी जाऊन संवाद साधत विकासाचा अजेंडा मांडण्यात आला. प्रचारादरम्यान नागरिकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत असला तरी, विकासाच्या मुद्द्यावर भाजपला सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

एकूणच, प्रभागातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असून, ‘विकासासाठी एकत्र येऊया’ या भूमिकेवरून पुढील निवडणूक लढत अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version