Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २४ मध्ये प्रचाराची रणधुमाळी वेग घेत आहे. अधिकृत उमेदवार सिध्देश्वर बाळासाहेब बारणे यांनी जय भवानी नगर कॉलनीत प्रचार फेरी काढत मतदारांशी थेट संवाद साधला. या प्रचार दौर्‍याला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

घराघरात जाऊन मतदारांशी संवाद, विकासकामांचा लेखाजोखा आणि पुढील कार्यकाळाचा स्पष्ट रोडमॅप मांडत सिध्देश्वर बारणे यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली. “आपले बहुमोल मत देऊन मला विजयी करा,” असे आवाहन करत त्यांनी मतदारांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला.

प्रभाग २४ मध्ये निवडणूक रंगात येत असताना सिध्देश्वर बारणे यांचा प्रचार वेग, कार्यकर्त्यांची सक्रियता आणि मिळणारा प्रतिसाद पाहता लढत अधिकच चुरशीची होत असल्याचे स्पष्ट होत आहे. आता या प्रचाराचा कौल मतदार १५ जानेवारी रोजी मतदानातून देणार असून, प्रभाग २४ चा निकाल शहराच्या राजकारणाकडे लक्ष वेधणारा ठरण्याची चिन्हे आहेत.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version