Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “चार बटणे कमळाची आणि पाच वर्षे विकासाची” हा ठाम निर्धार घेऊन आज काळेवाडीतील विजयनगर परिसरात राजकीय रणशिंग फुंकण्यात आले. विजयनगर येथील शांती कॉलनी क्रमांक १, २ आणि ३ मध्ये घरोघरी जाऊन थेट प्रचार करत उमेदवारांनी विकासाच्या मुद्द्यावरून विरोधकांना उघड आव्हान दिले.

नुसत्या घोषणा नव्हे, तर कामाचा हिशेब मांडत मतदारांसमोर पाच वर्षांचा विकासनामा ठेवण्यात आला. रस्ते, पाणी, ड्रेनेज, नागरी सुविधा आणि मूलभूत प्रश्नांवर ठोस भूमिका मांडत “आम्ही बोलत नाही, करून दाखवतो” असा स्पष्ट संदेश देण्यात आला.

या प्रचारादरम्यान नागरिकांनीही प्रश्नांचा भडिमार करत जाब विचारला, तर उमेदवारांनी प्रत्येक प्रश्नाला थेट उत्तर देत आपली तयारी आणि आत्मविश्वास दाखवून दिला. विकासाच्या मुद्द्यावर अडचणीत सापडलेले विरोधक मात्र या आक्रमक प्रचारामुळे पूर्णपणे बॅकफूटवर गेले असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

काळेवाडी–विजयनगरमधील हा प्रचार केवळ भेटीगाठीपुरता मर्यादित न राहता,निवडणुकीच्या रणांगणातील निर्णायक टप्प्याची नांदी ठरत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.

आता मतदार काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण प्रभागाचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version