Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ (वाकड–ताथवडे–पुनावळे) येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. शनिवार, दि. ३ जानेवारी २०२६ रोजी श्री नरसिद्ध मंदिर येथे विधीवत नारळफोड करून अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
शिवसेनेचे अधिकृत उमेदवार (अ) श्री. सागर विजय ओव्हाळ आणि (ड) श्री. चेतन अण्णा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ माजी मंत्री, शिवसेना नेते व विधान परिषद सदस्य मा. सचिन अहिर यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर ताथवडे गावठाणातून भव्य प्रचार दौऱ्याला सुरुवात झाली. ढोल-ताशांचा गजर, शिवसेनेच्या घोषणा आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती यामुळे परिसरात निवडणुकीचे वातावरण तापले होते.

या प्रचार दौऱ्यात विशेषतः “अबकी बार चेतन पवार” हा नारा नागरिकांमध्ये चांगलाच रुजताना दिसून आला. तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांकडून या घोषणेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे प्रचाराला बळ मिळाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार दौऱ्याची प्रभावी वाटचाल सुरू असल्याचे चित्र होते.

प्रचारादरम्यान उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत स्थानिक प्रश्न, नागरी सुविधा, रखडलेली विकासकामे, पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक आणि नियोजनबद्ध विकास यावर सविस्तर चर्चा केली. नागरिकांनी आपल्या समस्या मांडत शिवसेना (उ. बा. ठा.) गटाकडून सकारात्मक बदलाची अपेक्षा व्यक्त केली.

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, प्रेम आणि पाठिंबा पाहता प्रभाग क्रमांक २५ मध्ये परिवर्तनाची लाट स्पष्टपणे जाणवत असल्याचे राजकीय निरीक्षकांकडून बोलले जात आहे. “हा केवळ निवडणूक प्रचार नसून विकास, विश्वास आणि लोकशाही मूल्यांसाठीचा लढा आहे,” अशी भावना यावेळी शिवसेना नेत्यांनी व्यक्त केली.
प्रभाग २५ मध्ये “अबकी बार चेतन पवार” या नार्याने प्रचाराला नवी धार मिळाली असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा प्रचार दिवसेंदिवस अधिक वेग घेत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version