Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर परिसरातील प्रभाग क्रमांक २८ मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या अधिकृत उमेदवार अनिता संदीप काटे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. या भेटीच्या माध्यमातून त्यांनी केवळ प्रचार न करता, आपल्या कार्यशैलीची बांधिलकी आणि नागरिकांशी असलेले जपलेले नाते अधोरेखित केले.

अनिता काटे यांनी नागरिकांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करत, पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, उद्याने आणि सार्वजनिक सुविधा यांसह विविध क्षेत्रातील प्रश्न जाणून घेतले. प्रत्येक समस्येवर ठोस उपाययोजना करण्याची ग्वाही त्यांनी नागरिकांना दिली.

स्थानिक नागरिकांनी अनिता काटे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत, त्या नेहमी उपलब्ध असलेल्या आणि प्रश्न सोडवणाऱ्या लोकप्रतिनिधी असल्याचे सांगितले. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण वर्गाकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसून आला. या संवादातून प्रचाराच्या पलीकडे जाऊन जनतेशी जपलेले नाळ, विश्वासाचे नाते आणि विकासाची ठोस दिशा पुन्हा एकदा अधोरेखित झाली. त्यामुळे प्रभाग क्रमांक २८ मध्ये निवडणूक प्रचाराला अधिक वेग मिळाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.

प्रत्येक नागरिकाची समस्या माझ्यासाठी महत्त्वाची आहे. मी सतत उपलब्ध राहून प्रभागातील विकासकामांसाठी पाठपुरावा करत राहीन आणि नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा पूर्ण प्रयत्न करीन.

– अनिता काटे, उमेदवार, भाजपा. प्रभाग-28.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version