Spread the love

 

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये भाजपाने दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
आता पिंपरी चिंचवड भाजपाच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवारी (दि. ३ जानेवारी) सकाळी ११ वाजता भक्ती शक्ती उद्यान येथे आयोजित करण्यात आला आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भक्ती शक्ती समूह शिल्प येथून प्रचारास शुभारंभ होणार आहे. यावेळी भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, अमित गोरखे, उमा खापरे, माजी आमदार अश्विनीताई जगताप, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजपा प्रदेश युवा मोर्चा माजी अध्यक्ष अनुप मोरे, भाजपा दक्षिण आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले तसेच भाजपाचे सर्व प्रभागातील उमेदवार, भाजपा प्रदेश पदाधिकारी, शहर पदाधिकारी, सर्व मंडळ अध्यक्ष, सर्व आघाड्यांचे प्रमुख आदी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष निमंत्रक शत्रुघ्न काटे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version