Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ज्येष्ठ नागरिकांकडून मिळणारे संस्कार, परंपरेचा वारसा, समाजसेवेची दिशा आणि आपलेपणा हेच समाजाचे खरे भांडवल आहे. म्हणूनच ज्येष्ठांच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही पिंपरीगाव, वैभव नगर, जिजामाता हॉस्पिटल, मिलिंद नगर प्रभाग क्रमांक २१ मधील भारतीय जनता पक्ष – आरपीआय (आठवले) पक्षाच्या अधिकृत उमेदवार उषा संजोग वाघेरे यांनी दिली.

प्रभागातील प्रचाराच्या निमित्ताने आयोजित ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या बैठकीत उषा वाघेरे यांनी ज्येष्ठ नागरिकांशी दिलखुलास संवाद साधला. यावेळी भाजपा आरपीआय आठवले पक्षाचे अधिकृत उमेदवार मोनिका सुरेश निकाळजे, गणेश रामराव ढाकणे, नरेश रामचंद पंजाबी उपस्थित होते.

या बैठकीदरम्यान ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधा, सोसायटीतील आवश्यक मूलभूत गरजा तसेच प्रभागात सुरू असलेल्या व प्रस्तावित विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांनी मांडलेल्या सूचना, अपेक्षा व समस्यांचा आढावा घेत उषा वाघेरे यांनी त्यावर योग्य तोडगा काढण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधण्याचे आश्वासन दिले.

नागरिकांच्या विश्वास व सहकार्यामुळेच प्रभागातील लोकाभिमुख उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवता येतात. नागरिकांच्या सहभागातून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा संकल्प अधिक दृढ झाला असल्याचे सांगत, भारतीय जनता पक्ष आणि आरपीआय (आठवले) पक्षाच्या अधिकृत चारही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन उषा वाघेरे यांनी केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version