Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून भाजपचे अधिकृत उमेदवार विनोद नढे यांनी प्रचाराचा झंजावात सुरू केला आहे. प्रभागातील मूलभूत नागरी समस्या, अपूर्ण विकासकामे आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणी यांचा थेट आढावा घेत विनोद नढे यांनी मतदारांशी संवाद साधत प्रचाराचा आढावा घेतला.
प्रभागातील मूलभूत नागरी सुविधा, पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छता, आरोग्य सेवा तसेच विकासकामांतील रखडपट्टी या मुद्द्यांकडे विशेष लक्ष देत, “नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारा आणि प्रत्यक्ष काम करणारा नगरसेवक देणे गरजेचे आहे,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक समस्येची सविस्तर नोंद घेत, निवडणुकीनंतर त्या मार्गी लावण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
आज झालेल्या प्रचार दौऱ्यात राजवाडेनगर, परमवीर कॉलनी, साईश्रद्धा कॉलनी, जयहिंद तसेच गंगाराम माने शाळेजवळील परिसर येथे घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला. या दौऱ्यात स्थानिक नागरिकांनी पायाभूत सुविधांबाबतच्या अपेक्षा, अपूर्ण कामांमुळे होणाऱ्या अडचणी आणि भविष्यातील विकासाबाबतच्या सूचना मांडल्या.

विनोद नढे यांनी सांगितले की, “प्रभागाचा सर्वांगीण विकास, पारदर्शक कारभार आणि नागरिकांच्या विश्वासावर आधारित राजकारण हेच माझे ध्येय आहे.” त्यांच्या प्रचाराला स्थानिक नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, प्रभाग २२ मधील निवडणूक लढत अधिकच चुरशीची होत असल्याचे चित्र आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version