Spread the love

 

पिंपरी, दि. १ (प्रतिनिधी)- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी१ हजार ९९३ दाखल केलेल्याअर्जापैकी ९९ उमेदवारी अपात्र झाले.१ हजार ८९४ अर्ज पात्र झाले आहेत.

छाननीनंतर ३८ उमेदवारांनी आपली तलवार म्यान करत माघार घेतली आहे. आज शुक्रवार माघारीची अंतिम मुदत आहे.महापालिका निवडणुकीसाठी ३० डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती. या मुदतीत ३२ प्रभागातील १२८ जागांसाठी १ हजार ९९३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

या अर्जांची ८ निवडणूक निर्णय अधिकारी
ह क्षेत्रीय कार्यालयात सर्वाधिक अर्ज बाद
आठ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामधील ह
क्षेत्रीय कार्यालयातील सर्वाधिक ३५ उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. त्याखालोखाल ग-२६, अ-१२, फ-८, ई-६, ड-७, क-५ असे ९९ अर्ज
अपात्र झाले आहेत. कार्यालयात बुधवारी आणि गुरुवारी छाननी करण्यात आली. या छाननीमध्ये ९९ जणांचे अर्ज अपात्र ठरले आहेत.

१ हजार ८९४ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत. अर्ज छाननीनंतर राजकीय पक्षांसह ३८ अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली आहे. दरम्यान, अ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभागांमधील ११, ब२, क-१२, ड-८, ई-५, ग-२, ह-१ अशा ३८ जणांनी आपले ४१ अर्ज मागे घेतले आहेत.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version