Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २८ पिंपळे सौदागर–रहाटणी परिसरात राजकीय हालचालींना वेग आला असून, सौ. अनिता संदीप काटे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत व्यापक भेटीगाठी घेतल्या. घराघरांत जाऊन, सोसायटी बैठका आणि परिसरातील नागरिकांशी प्रत्यक्ष चर्चा करत त्यांनी लोकभावनांचा ठाव घेतला.

या जनसंवादातून नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा तसेच महिलां व ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर मोकळेपणाने मते मांडली. प्रत्येक मुद्दा गांभीर्याने ऐकून घेत, त्यावर सकारात्मक आणि विश्वासार्ह भूमिका मांडत उपाययोजनांची दिशा स्पष्ट करण्यात आली. “समस्या केवळ ऐकून न थांबता, त्या मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल,” असा ठाम विश्वास सौ. काटे यांनी व्यक्त केला.

लोकहिताला केंद्रस्थानी ठेवून पारदर्शक व विकासाभिमुख कार्यपद्धतीचा अवलंब करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी अधोरेखित केला. प्रभागातील मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावणे, नियोजनबद्ध विकासकामे, महिलांसाठी सुरक्षितता व सशक्तीकरण, तसेच युवकांना संधी उपलब्ध करून देणे हा त्यांच्या अजेंड्याचा केंद्रबिंदू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या दौऱ्यादरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सकारात्मक सहभाग दिसून आला. स्थानिक कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहून जनसंवाद अधिक प्रभावी झाला. वाढता जनसंपर्क आणि थेट संवादाची भूमिका पाहता प्रभाग २८ मध्ये सौ. अनिता संदीप काटे यांची राजकीय उपस्थिती अधिक भक्कम होत असल्याचे चित्र आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट संवाद, लोकभावनांची दखल आणि विकासाचा स्पष्ट आराखडा यामुळे प्रभाग २८ मधील राजकीय समीकरणे निर्णायक वळण घेण्याची चिन्हे दिसत आहेत.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version