Spread the love

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड परिसरातील प्रभाग क्रमांक १८ मध्ये आज राजकीय घडामोडींना वेग आला असून, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री. सुरेश शिवाजी भोईर उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. “चला उमेदवारी अर्ज भरण्यास” या आवाहनातून सुरेश भोईर यांनी विकासाचा निर्धार पुन्हा एकदा मतदारांसमोर मांडला आहे.

दीर्घकाळ नगरसेवक म्हणून कार्यरत असलेले  सुरेश भोईर हे सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी ओळखले जातात. पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, शिक्षण व मूलभूत सुविधा या विषयांवर त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. “पुन्हा एकदा महाविजय होणार” असा विश्वास त्यांच्या समर्थकांमध्ये दिसून येत आहे.
आज सोमवार, दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता उमेदवारी अर्ज भरण्यात येणार असून, सुरेश भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालय, प्रभात कॉलनी, केशवनगर, चिंचवड येथे नागरिक, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता असून, भाजपकडून निवडणूक प्रचाराला अधिक वेग मिळणार आहे.

“विकासाच्या शिलेदाराला साथ द्या” असे आवाहन करत सुरेश भोईर यांनी प्रभागातील नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही उमेदवारी चिंचवडमधील राजकीय समीकरणे बदलणारी ठरेल, अशी चर्चा सध्या रंगली आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version