Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विनोद नढे यांनी शनिवारी भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. प्रभाग क्र.२२ काळेवाडी, विजयनगर मधून त्यांची भाजपकडून उमेदवारी आता झाली आहे. या प्रभागात विनोद नढे यांच्या भव्य प्रचार शुभारंभ रॅलीचे आज रविवार (दि.२१) आयोजन करण्यात आले आहे.

हि भव्य प्रचार रॅली आज (दि.२१) सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या प्रचार रॅलीची सुरुवात काळेवाडी येथील पंचनाथ चौक येथून होणार असून, रॅलीचा मार्ग विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, पवना चौक, जीवन चौक, भारतमाता चौक असा असणार आहे. रॅलीचा समारोप तापकीर मळा चौक येथे होणार आहे. या प्रचार शुभारंभ रॅलीत महापालिकेतील सत्ताधारी व विरोधी पक्षातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती विनोद नढे यांच्याकडून देण्यात आली आहे.

प्रभागातील विकासकामांचा आढावा, नागरिकांशी थेट संवाद साधत निवडणूक प्रचाराला अधिक गती देण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमुळे प्रभाग क्रमांक २२ मध्ये निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापणार असून, राजकीय हालचालींना वेग येणार असल्याचे चित्र दिसत आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version