Spread the love
“प्रभाग ११ मध्ये भाजपाच्या निशा यादव यांची ‘घर टू घर’ मोहीम जोरात”

चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्र.११ चिखली, कृष्णानगर भागात भाजपाच्या निशा दिनेश यादव यांनी ‘घर टू घर’ गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. या प्रभागातून भारतीय जनता पक्षाकडून तीव्र इच्छुक असून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाचं व्हिजन आणि प्रगतीचा निर्धार घेऊन बुधवारी चिखली, कृष्णानगर परिसरात ‘घर घर संपर्क’ मोहीम राबवण्यात आली. यावेळी परिसरातील नागरिकांशी मनमोकळा संवाद साधून प्रत्येक घरापर्यंत विकासाच्या योजना पोहोचवण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.
आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून विकसित शहराचे स्वप्न आपल्याला साकार करायचे आहे. निरंतर आणि स्वच्छ पाणीपुरवठा, उच्च दर्जाचे, सुरक्षित आणि रुंद रस्ते, नवीन उपक्रम आणि सर्वांगीण विकास कामांची गती कायम ठेवून या भागाचा चेहरा बदलण्याचं काम सातत्याने करणार असल्याचा विश्वास यावेळी निशा यादव यांनी प्रभागातील मतदारांना दिला.
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version