Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – समाजामध्ये वाचन संस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने “शांतता पुणेकर वाचत आहेत” या विश्वविक्रमी उपक्रमात पिंपळे सौदागर येथील ऑल सिनियर सिटीझन असोसिएशनच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित उन्नती सोशल फाउंडेशनच्या विठाई वाचनालयात सामुहिक पुस्तक वाचन केले.

राष्ट्रीय पुस्तक ट्रस्ट, शिक्षण मंत्रालय भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१३ ते २१ डिसेंबर या कालावधीत पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या महोत्सवाचा एक भाग म्हणून “शांतता पुणेकर वाचत आहेत” या उपक्रमात मंगळवार दि.९ रोजी ऑल सिनियर सिटीझन असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुभाष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव सखाराम ढाकणे तसेच रमेश वाणी, रमेश चांडगे, अशोक येळंमकर, अनिलकुमार शाह, दिलीप चौगुले या पदाधिकाऱ्यांसह बाळकृष्ण चौधरी, बडगुजर, नेमाडे, पाटोळे, बोरसे या सदस्यांनी विविध पुस्तकांचे सामुहिक वाचन केले.

 

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version