Spread the love

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महावितरणच्या ग्रंथालयात पुस्तकं भेट

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त वीज कर्मचारी अभियंता सेनेचे प्रादेशिक सल्लागार संतोष सौंदणकर यांच्या पुढाकारातून पुण्यातील रास्ता पेठ मुख्य कार्यालयातील महावितरणच्या ग्रंथालयासाठी पुस्तके भेट देण्यात आले.

यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार व औद्योगिक संबंध अधिकारी पुणे शिरीष काटकर, वीज कर्मचारी अभियंता सेनेचे प्रादेशिक अध्यक्ष मनोहर शिंदे व सुरज भराटे उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक पटलावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचा पडलेला प्रभाव अतुलनीय आहे. असंख्य लोकांच्या हृदयात त्याच्या पाउल खुणा दडलेल्या आहेत. त्या खुणा कुठलीही शक्ती मिटवू शकत नाही. त्यांचे विचार नेटाने आणखी पुढच्या पिढीला सुपूर्द करायचे आहेत. पुस्तक वाचून मनुष्य आणखी विचारी बनतो. विचारी मनुष्यच समाजात नक्कीच परिवर्तन घडवून आणू शकतो, असे मत यावेळी संतोष सौंदणकर यांनी व्यक्त केले.

महावितरणच्या ग्रंथालयासाठी पुस्तके भेट दिल्याबद्दल ग्रंथालय प्रशासनाने संतोष सौंदणकरांचे आभार मानले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version