Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)पिंपरी विधानसभेतील संत तुकाराम नगर प्रभागातील माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पुनश्च प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत पुणे येथील पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

ननावरे हे काही वर्षांपासून शिवसेना (एकनाथ शिंदे) गटात कार्यरत होते. मात्र पुन्हा मूळ पक्षात म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परत येत त्यांनी ‘घरवापसी’ केली आहे. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते श्याम लांडे, ज्येष्ठ नेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जितेंद्र ननावरे यांनी 2007-2012 या काळात पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व क्रीडा समितीचे सभापती म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर पत्नीच्या उमेदवारीच्या राजकीय प्रक्रियेत त्यांनी काही काळ शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. आता पुन्हा राष्ट्रवादीत परतत त्यांनी पक्षावरचा विश्वास पुन्हा दृढ केल्याचे म्हटले जात आहे.

या प्रवेशाबाबत पक्षात सकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या असून पिंपरी विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद अधिक मजबुत होणार असल्याचे मत पक्षातील वरिष्ठांनी व्यक्त केले. स्थानिक राजकारणात या प्रवेशामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version