Spread the love

 

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  चिंचवड येथील कमला एज्यूकेशन सोसायटी प्रतिभा ग्रुप ऑफ इान्स्टिट्यूट मधील प्रतिभा ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांना इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट तर्फे गुणवंत शिक्षक पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार शिक्षण क्षेत्रातील केलेल्या भरीव कार्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले परिश्रम व संस्थेशी प्रामाणिक राहून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सातत्याने केलेले प्रयत्न यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला. प्रतिभा ज्युनिअर कॉलेजचे प्रा. रघुनाथ ताम्हाणे, प्रा. सुरेखा कुंभार , प्रा. तृप्ती बजाज व वरिष्ठ लिपिक भूषण महाजन यांना स्मृतीचिन्ह देत या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कॉलेजच्या प्राचार्या डॉ.वनिता कुऱ्हाडे व संस्थेचे सचिव डॉ दीपक शहा, खजिनदार डॉ . भूपाली शहा , संचालिका डॉ . तेजल शहा तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सन्मानित शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version