Spread the love
वाकड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आनंद  ज्येष्ठ नागरिक संघाच्या  मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकू तिळगुळ वाण व भेटवस्तू देऊन साजरी करण्यात आली.यावर्षी त्यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या  अध्यक्ष वृषाली मरळ होत्या.तर प्रमुख पाहुण्या  स्वाती कलाटे होत्या. सांस्कृतिक कार्यक्रमात समूह दीप नृत्य, अनेकविध गीतगायन,कथाकथन, कोडे,विनोद सादरीकरण,आत्मकथन,सायानी पत्र वाचन असे रंगारंग कार्यक्रम तर होतेच त्याशिवाय आजी आजोबांच्या नातवांच्या कला गुण यांना वाव देत त्यांचे देखील वाव देण्याचे ठरवल्याने कुमार सिद्धार्थ याने पियानोवर आपली कला सादर केली.
   सदर कार्यक्रमात बोरकर,श्री व सौ निकुंभ, श्रीमती विजया चौधरी,सौ बऱ्हाटे,सौ बोंडे,सौ. कानडे,श्री जाजू,श्री भेरकर,श्री बेलोकर,श्री पाठक, श्रीमती सफाई,सौ चित्रा,सौ रुबी,श्री केसकर यांनी कार्यक्रमात सहभागी नोंदवला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघाचे अध्यक्ष श्रीभागवत कोल्हे, सौ नलिनी कोल्हे,श्री सुरेश बोरकर,श्री मुरलीधर लहाने,श्री अप्पासाहेब तेली,श्री माधव बऱ्हाटे,श्री अशोक बोंडे,श्री प्रवीण कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.
Share.
Leave A Reply

Exit mobile version