Spread the love

 

वाकड,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वाकड येथील भूमकर चौकातील अस्पष्ट आणि मोडकळीस आलेले दिशादर्शक फलक हटवून त्याठिकाणी नवीन फलक लावण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल वाकडकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ड प्रभागातील जनसंवाद सभेत संबंधित अधिकाऱ्यांकडे केली आहे. याबाबत त्यांनी लेखी पत्र दिले आहे.

वाकड येथील भूमकर चौक हा नेहमीच गजबजलेला परिसर असून या ठिकाणहून जाणाऱ्या वाहनांची संख्या खूप मोठी आहे. हिंजवडी आयटी पार्क परिसर याच भागात असल्याने नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.
मुंबई बेंगलोर महामार्गालगत हा भाग असल्याने वाहनचालकांना योग्य रस्ते आणि दिशा समजण्यासाठी दिशादर्शक फलक सुस्थितीत असणे आवश्यक आहे,

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी या ठिकाणी लवकरात लवकर नवीन फलक लावण्यात यावे अशी मागणी श्री विशाल वाकडकर यांनी केली आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version