Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने तरुण पिढीला एकत्र आणण्यासाठी आणि त्यांना सामाजिक बदलाचे सैनिक बनवण्यासाठी “युवा जोडो अभियान” हा महत्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवला जाणारा हा उपक्रम तरुणांना लोकशाही मूल्ये, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रविकासात सहभागी होण्यासाठी प्रेरित करणारा आहे.

१० आणि ११ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबई येथील टिळक भवन येथे पार पडलेल्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत या अभियानाला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीस भारतीय युवक काँग्रेसचे महासचिव तथा महाराष्ट्र प्रभारी अजय चिकारा, सहप्रभारी नवज्योत संधू आणि शांभवी शुक्ला यांच्यासह सर्व प्रदेश पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष आणि विधानसभा अध्यक्ष उपस्थित होते.
हा उपक्रम तरुणांना काँग्रेसच्या विचारधारेशी जोडण्याचा आणि त्यांच्या स्वप्नांना, समस्यांना आणि अपेक्षांना व्यासपीठ देण्याचा एक अनोखा प्रयत्न आहे. या अभियानामुळे महाराष्ट्रातील तरुणांना देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सक्रिय योगदान देण्याची संधी मिळणार आहे.

या अभियानाचे नेतृत्व करणारे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांनी सांगितले की, “तरुण ही देशाची खरी ताकद आहे. या अभियानातून आम्ही त्यांना समाजकार्य आणि धोरण प्रचारात सक्रिय सहभागी करून देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याची संधी देत आहोत.”

सामील व्हा, बदल घडवा!
सर्व उत्साही तरुणांनी या ऐतिहासिक अभियानात सहभागी होण्यासाठी 080-47358279 वर मिस कॉल करून आपली नोंदणी करावी आणि देशाच्या प्रगतीत आपले योगदान द्यावे!, असे आवाहन युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव चंद्रशेखर जाधव यांनी केले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version