Spread the love

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवडच्या विकास शिक्षण मंडळं संचालित श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयाच्या इ 5 वी च्या विद्यार्थिनीने 2 ऱ्या पिंपरी चिंचवड लुडो जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला.

कु श्रेया शाकीर गायकवाड इ 5 वी हिने पुणे येथे दि 26/7/2025 रोजी झालेल्या जिल्हा स्तरीय निवड स्पर्धेत भाग घेऊन तृतीय क्रमांक प्राप्त केला त्याबद्दल तिचे संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष जगदीश दादा जाधव, सचिव संजय भाऊ जाधव, संचालक विजय जाधव सर, उपाध्यक्ष श्री अमित बच्छाव यांनी अभिनंदन केले.

तसेच विद्यालयाच्या वतीने माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक  बाळाराम पाटील, पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका  पुष्पा शिंदे , माध्यमिक उपमुख्याध्यापिका सौ सुषमा संधान, प्राथमिक विभागाचे पर्यवेक्षक साहेबराव देवरे कोर कमिटी सदस्य छाया ओव्हाळ,  मनीषा जाधव यांनी मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version