Spread the love

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवडच्या विकास शिक्षण मंडळं संचालित श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयाच्या इ 8 वी च्या विद्यार्थिनीने राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला.

कु वैष्णवी बाळासाहेब बांदल हिने मुंबई येथे दि 18 ऑगस्ट रोजी झालेल्या राष्ट्रीय नृत्य स्पर्धेमध्ये भाग घेऊन द्वितीय क्रमांक प्राप्त केला त्याबद्दल तिचे संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष जगदीश जाधव, सचिव संजय जाधव, संचालक विजय जाधव यांनी अभिनंदन केले.

तसेच विद्यालयाच्या वतीने माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक बाळाराम पाटील, पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पुष्पा शिंदे , माध्यमिक उपमुख्याध्यापिका सुषमा संधान, प्राथमिक विभागाचे पर्यवेक्षक साहेबराव देवरे कोर कमिटी सदस्य छाया ओव्हाळ, मनीषा जाधव यांनी मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version