Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसतर्फे भोसरी विधानसभा मतदारसंघातील साने चौक, मोरे वस्ती येथे मशाल मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा काँग्रेसच्या विविध मागण्यांसाठी व जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

या मशाल मोर्चात पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस ओबीसी विभागाचे शहराध्यक्ष सोमनाथ शेळके, ब्लॉक अध्यक्ष विठ्ठल शिंदे, वरिष्ठ उपाध्यक्ष बाबा बनसोडे, आदरणीय शहर जिल्हाध्यक्ष डॉ. कैलास कदम, महिला नेत्या आशा भोसले, युवा नेते सतीश भोसले, श्री. लोहार समृद्धी आणि आदी उपस्थित होते.

कार्यकर्त्यांच्या हातात मशाली आणि घोषणा देत त्यांनी सरकारविरोधात आपला निषेध नोंदवला. स्थानिक नागरिकांनीही मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दर्शवत मोर्चात सहभाग घेतला. या मोर्चातून स्थानिक तसेच शहरातील विविध प्रश्नांवर प्रकाश टाकण्यात आला.

काँग्रेस पक्षाने हे आंदोलन पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला असून, जनतेच्या हितासाठी लढा सुरूच राहील, असे आश्वासन शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी यावेळी दिले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version