Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीक्षेत्र अयोध्या येथे श्री राम जन्मभूमी मंदिराचे उद्घाटन व प्राणप्रतिष्ठा दि.२२ जानेवारी रोजी होत आहे. त्यामुळे सर्व देशभर उत्साहाचे, आनंदाचे वातावरण आहे. हा आनंद द्विगुणीत करण्यासाठी वाकड गाव तसेच परिसरातील सर्व सोसायटी मधील सर्व नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या पुढाकाराने वाकडमध्ये उद्या दि.२२ रोजी सकाळी ६ वाजता प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचा भव्य सामूहिक आरती सोहळा आयोजित करण्यात आले असल्याची माहिती भाजपाचे युवानेते राम वाकडकर यांनी दिली आहे.

राम वाकडकर यांनी म्हटले आहे की, सोमवार दि.२२ जानेवारी रोजी संपूर्ण देशभरात उत्सव साजरा केला जाणार आहे. त्याचप्रमाणे वाकड येथील माऊली चौक, ओमेगा पॅराडाईज सोसायटी रोड येथे सायंकाळी ६ वाजता प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा भव्य सामूहिक महाआरती सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तसेच सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. येथे फायर शो, फटाक्यांची आतिषबाजी व लेझर लाईट शोचे देखील आयोजन करण्यात आले आहे. तरी वाकड परिसरातील तमाम श्रीराम भक्तांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन राम वाकडकर यांनी केले आहे.
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version